spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महसूलमंत्रीच्या कार्यक्षेत्रातच अवैध रेती व्यवसाय जोमात, प्रशासन कोमात

 – रेती वाहतुकीला प्रशासनाचे अभय की अर्थपूर्ण मौंन ?

संदीप कांबळे कामठी :- राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रातील कामठी तालुक्यातील वारेगाव,बिना, नेरी ,उनगाव ,भामेवाडा, सोनेगाव राजा यासारख्या बहुतांश रेतीघाटावर अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून अवैध वाळू वाहतूकिलाही जोम आल्याने तहसील प्रशासनासह संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब बनली आहे.शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दिवस रात्र वाळु उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत यावर स्थानिक महसूल प्रशासन याकडे मात्र शांततेची भूमिका घेत मौन साधले तेव्हा हे अर्थपूर्ण मौन आहे का?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत असले तरी महसूल प्रशासनाच्या या अर्थपूर्ण मौनमुळे महसूल मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच महसूल ला चुना लावण्याचा गोरखधंदा सुरू आहे. कामठी तालुक्यातील विशेषता बिना, वारेगाव,सोनेगाव राजा, नेरी व भामेवाडा रेती घाटावर रात्रीच्या अंधारात बिनधास्त होणारी वाळु वाहतूक आता इतकी बिनधास्त झाली आहे की भरदिवसा ही ओव्हरलोड वाहने सुसाट धावताना दिसतात विशेष म्हणजे नेमका कोणाच्या वरदहस्ताने हा काळाबाजार सुरू आहे ,या काळाबाजाराला शह देणारा तो राजकीय पुढारी कोण?असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.एवढा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळतं असताना म्हसुल विभागाकडून कोणतीही कारवाही होत नाही म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे. बॉक्स-जिल्हाधिकारी साहेब, रेतिविरुद्ध विशेष मोहीम राबवा—अवैध वाळू व्यवसायचा खेळ थाबवायचा असेल तर जिल्हाधिकारी महोदय विशेष मोहीम राबवून महसुल,पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त कारवाई होणे आवश्यक आहे.स्थानिक तहसीलदार च्या नाकावर निंबू टिच्चून केला जाणारा वाळू व्यवसाय भविष्यात शासनाच्या तिजोरीवर मोठे संकट निर्माण करण्याची शक्यता आहे कामठी तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय चिंतेचा विषय बनला असून जिल्हाधिकारी महोदयांनी उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.