spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामूहिक सुवर्ण लग्नगाठ सोहळा ; १२१ जोडप्यांच

सचिन चौरसिया,रामटेक :- महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली आनंदधाम, रामटेकचे महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित लक्ष्मणराव मेहर (बाबुजी) हे गेली अनेक दशके समाजप्रबोधन, अध्यात्म व सेवाभावी कार्यामध्ये निरंतर योगदान देत आहेत. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे असंख्य कुटुंबे सुखी, समाधानी व सुसंस्कारित जीवन जगत आहेत. तसेच अनेक सेवकांना धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे. आदरणीय बाबुजींनी आपल्या लग्नाचा ५१वा वाढदिवस परमात्मा एक सेवकांच्या सोबतीने साजरा करावा असे ठरवले व त्यानुसार ज्या सेवकांच्या लग्नाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत अशांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. या अनोख्या सोहळ्यात विवाह ३० वर्षापेक्षा अधिक काळ पूर्ण झालेल्या तब्बल १२१ जोडप्यांनी सहभाग घेतला. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पल्लवी जयस्वाल तसेच परमात्मा एक परिवारातील अनेक सेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आशिष जयस्वाल यांनी एकाच ठिकाणी १२१ जोडप्यांच्या सुवर्ण लग्नगाठ सोहळा साजरा होणे, हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगितले. या सुंदर कार्यक्रमास उपस्थित होतो. आयुष्यभर संसाररथ यशस्वीपणे चालवत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ दांपत्यांचा सन्मान सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे, वाढदिवस व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून केक वगैरे ऐवजी फळांचे वाटप करण्यात आले. साधेपणा, संस्कार, कुटुंबमूल्ये आणि समाजातील एकात्मता यांचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.