spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोली पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांना पकडले; ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, साकोली :- साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धाबेटेकडी येथील मोठ्या तलावाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १० आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ४ लाख ३३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून केली कारवाई मिळालेल्या माहितीनुसार, धाबेटेकडी तलावाच्या परिसरात काही लोक एकत्र जमून पैशावर हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता १० जण जुगार खेळताना मिळून आले.

या आरोपींवर झाली कारवाई पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये युवराज पंचबुद्धे (५३, शिवनी), मनिष शेंडे (३६, शिवनी), सेवकराम सार्वे (४०, मोगरा), मंगेश शिउरकर (३६, धाबेटकडी), शरद नान्हे (२६, धाबेटकडी), देवेंद्र दिघोरे (२५, चिचटोला), मिलींद खांडेकर (२३, शिवनी), नितेश नेवारे (३०, धाबेटकडी), गौरीशंकर चाचेरे (४२, धाबेटकडी) आणि शशिकांत शेंडे (३४, शिवनी) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे लाखनी तालुक्यातील रहिवासी आहेत.

४ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत आणि जुगाराच्या फळावरून १५,२१० रुपये रोख, ५८,००० रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन, ३,६०,००० रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४,३३,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अपराध क्र. २७४ /२०२६ कलम १२ (अ ) साकोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.हवा. चाचेरे, पोलीस शिपाई कोटवार व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.