– जिल्हाधिका-यांना कन्हान नगरपरिषदेत निवेदन देऊन मागणी
कन्हान :- शहरातील राजकिय आणि जनप्रतिनिधींची इच्छा शक्ती तसेच शासन, प्रशासनाचे अधिकारी यांची निष्कीयतेने दुर्लक्ष म्हणा कि, कन्हान शहर व परिसर अनेक दशकांपासुन तीव्र दुर्लक्षाचा बळी ठरला आहे. मुलभुत सोयीसुविधेच्या मुख्य गंभीर समस्या शहरात भेडसावत असल्याने कन्हान नगरपरिषदेला जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हयानी भेट दिली असता नागरिकांनी शहरातील गुजरी व शुक्रवार आठवडी बाजाराची स्थायी जागा, सुसज्य स्मशान घाट करिता जागा संपादन करून तात्काळ व्यवस्था करावी, रक्षाघाट बांधकाम व सुशोभिकरण तसेच शुध्द पिण्याचा पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.
कन्हान शहर व परिसर अनेक दशकांपासुन तीव्र दुर्लक्षाचा बळी ठरला आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांना वारंवार पत्रे, निवेदन देऊन विनंत्या केल्या आहेत, परंतु आजतागायत मुख्य समस्यांचे निराकरण होत नसल्याने कन्हान शहरातील पिडित नगरवासी संताप व्यकत करित अत्यंत दु:खाने जिल्हाधिकारी नागपुर हयानी नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे भेट दिली असता जनहितार्थ शहरात सार्वजनिक सोयीच्या किवा मालकी हक्काच्या रिकाम्या जागेचे भुसंपादन करित नसल्याने गुजरी व आठवडी बाजार महामार्गावर व भरगच्छ लोकवस्तीतुन जाणा-या तारसा रोड, पांधन रोडवर आणि गणेशनगर, हनुमान नगरच्या आतील रस्त्यावर भरत असल्याने रहिवासी नागरिकांना तसेच दुकानदार आणि ग्राहकांना जीव मुठीत घेऊन बाजारहाट करावा लागतो. कन्हान शहरात बाजारासाठी स्थायी जागेच्या अभावामुळे मुख्य रस्त्यांवर मोठी गैरसोय निर्माण होते. बंद पडलेल्या ग्रोमोर व्हेंचर्स कंपनीची सुमारे अडीच एकर जमीन काही काळापासुन पडीक आहे. जर ही जमीन नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन तिथे नियोजित गुजरी व आठवडी बाजार भरविला तर कन्हान शहरातील मुख्य बाजार व वाहतुक आणि व्यवसायाच्या समस्या कायमस्वरूपी सुटतील. 

जागे अभावी सुसज्ज स्मशान घाट नाही
कन्हान शहरात एकही असे स्मशानभूमी नाही जिथे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येतील. कन्हान, पिपरी व कांद्री शहरातील नागरिकांना कन्हान नदीच्या पलीकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळयात बारा ही महिने उघडयावर किवा कामठी येथिल स्मशान घाट येथे अंतिम संस्कार करावा लागतो. यास्तव कन्हान नदी काठालगत नगरपरिषद कन्हान अंतर्गत पडीक किंवा रिकाम्या जागेचे भुसंपादन करून एका सुसज्ज स्मशान घाटाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे .
शहरात शुध्द पिण्याचे पाण्याचा पुरवठा नाही
मागिल सात वर्षापासुन फिल्टर प्लॉंट चे काम सुरू असुन शहरात शुध्द पाणी पुरवठा करण्याकरिता पाईप लाईन टाकण्यात आली. परंतु पाणी कुठे मुरले की, अद्याप शहरात शुध्द पाणी पुरवठा होत नाही आहे . कित्येक वर्षापासुन कन्हान शहरात एका दिवसाआड एक वेळ कधी, कधी बिल्चींग पावडर टाकुन अशुध्द पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने दूषित पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, शुध्द, स्वच्छ पिण्याचे पाणी अखंड पुरवठा करण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी.
रक्षा विसर्जन घाट बांधुन सुशोभीकरण करावे
कन्हान नदीच्या काठावरील बीकेसीपी शाळे कडील कन्हान नदीत घाटाचे कुठलेही बांधकाम नस ल्याने धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या ‘रक्षा विसर्जन घाटा’ची सध्याची दयनीय अवस्था तात्काळ सुधारली पाहिजे, तेथे पाय-या, घाटाचे बांधकाम करून सुशोभी करण केले पाहिजे.
साहेब, कान्हानच्या लोकांचा संयम आता संपला आहे. प्रशासनाची ही उदासीनता आता आणखी सहन करू शकत नाही. जर या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत, तर कन्हानचे सर्व रहिवासी नागरिक आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यास भाग पडतील, ज्यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल. आपण एक संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणुन आम्हच्या व्यथा समजुन घ्याल आणि जनहितार्थ तात्काळ कारवाई करित कन्हान शहरातील मुख्य समस्या त्वरित सोडवाल. अशी मागणी जिल्हाधि कारी मा. कुमार आशिर्वाद हयाना नगरपरिषद कन्हान येथे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, नितीन मेश्राम यानी नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन केली आहे.








