spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुन्हा एकदा काँग्रेसचा दलितविरोधी चेहरा उघड!

हंसराज भंडारा :- काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी दलित समाजाचे कर्तृत्ववान नेते तथा माजी आमदार दिलीप बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे दलित समाजासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसने पुन्हा एकदा दलित समाजाच्या भावनांशी खेळ केल्याचे दिसून आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध ज्या प्रकारे काँग्रेसने राजकीय षडयंत्र रचून त्यांचा पराभव घडवून आणला होता, त्याच मानसिकतेचे दर्शन आजही काँग्रेसच्या वर्तनातून घडत आहे.

विधान परिषद निवडणुकीत दिलीप बनसोडे यांच्यावर दबाव टाकून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे नेते आ. नाना पटोले यांनी अनेक गंभीर आरोप व गुन्हे दाखल असल्याची चर्चा असलेल्या नरेश ईश्वरकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे काँग्रेसची दलित समाजाप्रती असलेली भूमिका आणि त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.

दलित समाजाच्या नेतृत्वाला संधी नाकारून काँग्रेसने समाजाच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यामुळे दलित समाजाने काँग्रेसच्या या दलित विरोधी भूमिकेचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

– आशु गोंडाणे

जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.