सचिन चौरसिया,रामटेक :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र रामटेक येथे गुरुवार रोजी गटस्तरीय कार्यक्रमांतर्गत “व्यक्तिमत्व विकास शिबिर” कार्यक्रमाचे आयोजन डॉ.प्रतिभा भाकरे (सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी कामगारांच्या कौतुकास्पद कामगिरी केलेल्या मुलांचा प्रमाणपत्र व पुष्पमालेसह सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुरेखा माकडे (नगरसेविका), छाया वंजारी (माजी उपसभापती ), पंकज बावनकर (देशोन्नती पत्रकार) आदी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कामगार कुटुंब मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. इंटरनॅशनल कराटे व थायबॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारा खेळाडू सोहम बारस्कर, सौम्य काटोके व नोवेल तापस राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक म्हणून लाभलेले निधी पाटील, शिवानी नागपुरे, सुरज डोंगरे यांनी (योगा, संस्कार वर्ग , कराटे , नृत व चित्रकला) आदीचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिता हडप केंद्र प्रमुख यांनी केले. यशस्वीते साठी संगीता भुजाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.








