spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हाधिकाऱ्यांकडून बेंबळा प्रकल्पाची पाहणी

यवतमाळ :- जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पाहणी केली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन, इमारत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या कार्यक्षमतेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली

Popular Articles