नागपूर :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने वर्धमान नगर उपविभाग कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात सहायक अभियंता निखिलकुमार नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
या प्रसंगी असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, नागपूर शहराध्यक्ष विलास कुमेरिया, शहर सचिव जयपाल हटवार, अरविंद चवरे, प्रकाश बोंबले, आकाश पातोंड, श्रीकांत मेश्राम, सगेंश मेश्राम, किरण शौर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.








