कोदामेंढी :- आज शनिवार (ता. 6 जून) ला पावडदौना येथे सायं.6 वाजता अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त सप्तखंजिरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार दूरदर्शन व झी मराठी कलाकार तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल करणार आहे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चेतन वानखेडे, बा रायगड परिवाराचे नागपूर विभाग प्रमुख श्रीधर वडे, गट ग्राम पंचायत पावडदौना सरपंच शीला नितेश वांगे सह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे आणि मित्र परिवाराने केले आहे.








