कन्हान :- नागपुर बॉयपास चारपदरी रस्त्यावरील ओरिएंटल टोल नाका प्लाजा कांद्री येथे मागिल काही दिवसांपासुन रात्री ला विश्राती करण्या-या प्रवाश्याना मारपिट करून लुटमारी च्या घटना वाढल्याने नगर पंचायत कांद्री-कन्हान च्या पदाधिका-यांनी टोल प्लाजा मँनेजर निनावे यांचेशी संवाद साधुन येथे विधृत रोषनाई व सुरक्षा यंत्रणा वाढविण्याच्या सुचना निवेदन देऊन केल्या आहे.
नागपुर बॉयपास चारपदरी रस्त्यावरील ओरिएंटल टोल प्लाजा कांद्री येथे मागिल काही दिवसांपासुन प्रवाशी रात्री च्यावेळी आपले वाहन बाजुला लावुन आराम करित असताना प्रवाशी निद्रावस्थेत असताना लूटपाट च्या घटनेत दिवसेदिवस वाढ झाल्यामुळे कांद्री-कन्हान नगरपंचायत च्या पदाधिका-यानी टोल नाका मॅनेजर मा. निनावे यांचेशी भेट घेऊन परिसराची सुरक्षेची माहिती घेत संवाद साधुन पेट्रोलिंग, सीसीटी वी कॅमेरे, विधृत रोषनाई वाढवण्यासाठी हायमास्ट लाइट्स वाढवुन या टोल प्लाजा परिसरात विधृत रोषनाई व सुरक्षा यंत्रणा वाढवुन प्रवाश्याना सुरक्षा प्रदान करण्याकरिता निवेदन देऊन सूचना करण्यात आल्या आहे. याप्रसंगी नगरपंचायत कांद्री-कन्हान नगराध्यक्ष सुजित पानतावणे, बंटी सरोदे, अतुल हजारे, नरहरी पोटभरे, सीताराम नाटकर, रविंद्र कोतपल्लीवार, सेवकराम कुंभलकर, तन्मय मेश्राम आदि प्पामुख्याने उपस्थित होते.








