– गुणवंत विद्यार्थी, खेळाडु व युवकांचा सत्कार करून गौरव
कन्हान :- महाराष्ट्राचे जाणतेराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त सनात नी धार्मिक संस्था कन्हान व गौ सेवा समिती कन्हान क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथील शिव पंचायत हनुमान मंदिर परिसरात भव्य कार्यक्रम आयोजित करून उत्साहपुर्ण वातावरणात विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, खेळाडु व युवकांचा सत्कार आणि गौरव करून शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.६) जुन ला शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक भरत सावळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ मार्गदर्शक गजराज देविया, शांतराम जळते, माजी सैनिक प्रविण सतदेवे, कॅप्टन सतिश बेलसरे, शिक्षक हरिश पोटभरे, पोलीस पाटील गुंडराव चकोले, प्रशिक्षक इंद्रपाल वंजारी, समाजसेविका मीना कळंबे आदी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करित विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवेचा संदेश देत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तदंतर बारावीच्या परिक्षेत पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावणारी अविका पाहुणे (८९.१७ %), द्वितीय क्रमांक राज चंद्रोल (८४.१७ %) आणि तृतीय क्रमांक खुशी शाह (७२.८३ %) यांना शिल्ड व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत पारशिवनी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त कु. आनंदी धोटे (९५.६०%) हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रामटेक येथे नुकत्याच पार पडलेल्या सिलंबम व थायबॉक्सींग स्पर्धेत शिवशंभु आखाडा कन्हान, कां द्री व निलज तसेच परमात्मा एक कला पथक मर्दानी आखाडा कांद्री-कन्हानच्या खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करित ७९ पदके पटकावित कन्हान परिसराचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्व खेळाडुंना पदक व सन्मान पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय हिंदुत्वाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणारे आयुष संतापे व हिमांशु सावरकर यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले. कार्यक्र माच्या यशस्वि आयोजनाकरिता सनातनी धार्मिक सं स्था कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर, लोकेश दमाहे , आयुष संतापे, हिमांशु सावरकर, जीवन नांदुरकर, वेदांत बावनकुळे, विनोद केने, राजन विनयवार, विनोद यादव, रमेश जयस्वाल, उदय माहुरे, निखिलेश चकोले, सुजल यादव सह सदस्यांनी सहकार्य केले.



