spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योजनांचा प्रसार अधिक प्रभावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

– जिल्हा माहिती कार्यालयाच्या डिजिटल स्क्रीन उपक्रमाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून कौतुक

गडचिरोली :- राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या डिजिटल आउटडोर स्क्रीनची पाहणी करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे आणि कमी खर्चात पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा याप्रसंगी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसारित करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल स्क्रीन उभारण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सातत्याने आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.

डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या माहितीची पाहणी करताना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केल्यास शासनाच्या योजना अधिक व्यापक स्तरावर आणि जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी डिजिटल स्क्रीनची संकल्पना, कार्यपद्धती, माहिती प्रसारणाची प्रक्रिया तसेच या माध्यमातून होणारे फायदे याबाबत मुख्य सचिवांना सविस्तर माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.