किशोर साहू, मौदा :- वीरसी – रेवराल पांधण रस्त्याचे काम मागील एक महिन्यापूर्वी पासून सुरू होते. पंधरा दिवसापूर्वी पासून वीरसी येथील एका शेतातून मुरमाचे उत्खनन सुरू होते. त्यामुळे या पांधण रस्त्यावर ट्रकचे आवागमन मोठ्या प्रमाणात झाल्याने रस्त्यावर टाकलेला गिट्टीच्या पहिला कोड पूर्णपणे उघडल्यामुळे व रस्त्यावर संपूर्ण गिट्टी विखुरल्यामुळे वाहनधारकांना जाण्या येण्यासाठी कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत रस्त्याचे कंत्राटदार जीएम निकम यांचे सुपरवायझर नरेश मानकर यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता मुरूम अभावी या व तालुक्यासह जिल्ह्यातील पांधण रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, मौदा तहसील कार्यालयात 20 मे पासून ते 4 जून पर्यंत मुरमाच्या रॉयल्टी पावत्या संपल्याने तुटवडा निर्माण झाला होता. त्यातच नवनवीन अटी शर्ती आल्याने मुरूम मिळण्यास विलंब होत आहे. 5 जून पासून रॉयल्ट्या पावत्या मिळण्यास सुरुवात झाल्याने आज रविवार (ता.7 जून) पासून पुन्हा रस्त्याचे कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
मौदा तहसील कार्यालयात मुरूम रायल्ट्या पावत्या संपल्याने पंधरा दिवस तुटवडा, त्यातच नवीन अटी शर्तीमुळे मुरूम अभावी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले रस्त्यांचे कामे कासवगतीने


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.






