– ग्रामपंचायत कडे ग्रामस्थांची मागणी
कन्हान :- गोंडेगाव चे वेकोलीने बोरडा रोडवर पुनर्वसन करून न्यु गोंडेगाव वसविले आहे. परंतु अद्याप ज्यांच्याकडे शेती नसुन शेतमजुरी व इतर कामे करणा -या गावक-यांना वेकोलिने योग्य मोबदला व पुनर्वसन न केल्याने काही गावकरी गावातच राहत आहे. गावातील ग्राम पंचायत सुध्दा मुलभुत सोयीकडे दुर्लक्ष करित असल्याने गावक-यांनी कमात कमी पाऊस येण्यापुर्वी मुळ गोंडेगावातील नाल्याची साफ सफाई करण्याची मागणी सरपंचा व सचिव हयाना पत्र देऊन केली आहे.
गोंडेगाव मुळ वस्ती मध्ये सांडपाणी वाहुन नेणा-या नाल्या मागिल एक वर्षापासुन साफ सफाई करण्यात न आल्याने काही ठिकाणी संपुर्ण नालीत कचरा व माती गेल्याने बंद झालेली आहे. तर काही नाल्यात गवत, प्लास्टिक व कचरा असल्याने सांडपाणी सामोर वाहुन जात नसल्याने दुर्गंधी पसरून आजार व रोगराईचा पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेकोली खुली कोळसा खदान व्दारे निर्माण केलेले कृत्रिम डोंगर, ढिगाऱ्याची माती मागिल वर्षी पावसाळ्यात पाण्या सोबत वाहुन आल्याने ग्राम पंचायत समोरील नाली पूर्णतः बंद झालेली आहे. पाणी निकासी होत नसल्याने नालीतील पाणी गावातील नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे गोंडेगाव सरपंचा मनिषा दलाल व सचिव हयाना लेखी पत्र देऊन पाऊस येण्यापुर्वी मुळ गोंडेगाव गावातील नाल्या ची साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक प्रणय खवले हयानी गावकरी नामदेव हुकुम, हर्ष तेलुते , मनोज गोंडाणे, सिताराम राऊत, विजय ठाकरे,गुलाब राऊत, महेन्द्र येसनसुरे, भिमराव मेश्राम, हिराबाई बर्वे, संध्या नेवारे, वंदना गोंळधे, कल्पना इडपाची, संगिता नेवारे, माला हुमने, सरिता नेवारे, गंगा गजभिये सह गावक-यांच्या वतीने केली आहे.







