– पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मनपाचे विशेष अभियान
नागपूर :- पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील उद्यान व परिसर स्वच्छ करण्याचा जागर आज (ता.8) संपूर्ण शहरात राबविण्यात आला. महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर,गटनेता गणेश चर्लेवार, असलम खान मुल्ला,शकील पटेल यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून शहरातील सर्व झोनमधील 75 उद्याने व परिसराची साफसफाई करण्यात आली. यात संबंधित विभागाचे झोन सभापती, विविध विशेष समित्यांचे सभापती, प्रभागातील नगरसेवक, उपायुक्त व झोन अधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचार्यांनी सहभाग घेऊन शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जात असलेल्या उद्यानांची सघन साफसफाई केली. यावेळी महापौर निता ठाकरे व इतर पदाधिकार्यांनी नागरिकांनी या अभियानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करून या अभियानात नागरिकांनी यापुढेही सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
येत्या 5 जून ते 21 जूनपर्यंत शहरात पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे. याच साखळीत आज (ता. 8) शहरातील उद्याने व परिसराची स्वच्छता करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार उद्यानात सकाळ पासून साफसफाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबत परिसरातील युवक व ज्येष्ठ, नागरिक व महिलांनी आपला वाटा उचलला. सकाळ वृत्तसमुहाने मनपाच्या या अभियानात सहकार्य केले.
शहरातील सर्व झोनमधील उद्यानांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत लक्ष्मीनगर झोन समिती सभापती लक्ष्मी यादव, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, मंगळवारी झोन सभापती सीमा डवरे, हनुमाननगर झोन सभापती ज्योती देवघरे, धंतोली झोन सभापती भारती बुंदे, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, गांधीबाग झोन सभापती उमा देशमुख, सतरंजीपुरा झोन समिती सभापती अभिरूची राजगिरे,लकडगंज झोन सभापती महेश्वरी बिसेन, आशीनगर झोन सभापती आसिफ शेख, परिवहन विशेष समिती सभापती मंगला खेकरे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती संतोष देवी लढ्ढा, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, क्रिडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, जलप्रदाय समितीच्या सभापती दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे यांच्यासह उपसभापती सुधीर राउत, प्रदीप पोहाणे, श्रीकांत आगलावे, ॲङ संजय बालपांडे, संजय चावरे, विजय झलके, सुनील हिरणवार संबंधित प्रभागातील नगरसेवक व झोन अधिकार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

परिसर स्वच्छतेवर भर द्या – महापौर
नागपूर शहरातील देशातील स्वच्छ व सुंदर शहराच्या यादीत आणण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध राहण्याची आवश्यकता असून आजची मोहिम ही या अभियानाची सुरूवात असल्याचे प्रतिपादन महापौर निता ठाकरे यांनी केले.
लकडगंज झोनमधील भारतमाता उद्यानात साफसफाई मोहिमेत भाग घेतल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना महापौर श्रीमती ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, सत्ता पक्षनेते नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य सभापती मनीषा अतकरे, शिक्षण सभापती संतोषदेवी लढ्ढा, नगरसेवक बालु रारोकर, नगरसेवक राजेश्वर दिवटे, नगरसेवक संजय अवचट, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त विजय थूल, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, नागपूर महानगरपालिकेतर्फे ५ ते २१ जून या कालावधीत ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहकार्यातून दररोज विविध भागांची साफसफाई केली जात असून, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी यापुढेही स्वच्छतेवर सातत्याने भर दिला जाईल. शहरातील हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करावे- आमदार कृष्णा खोपडे
यावेळी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, “नागपूर शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेले स्वच्छता अभियान अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले शहर देशात प्रथम क्रमांकावर यावे यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. तसेच, शहरातील उद्याने आणि मैदानाच्या विकासासाठी आवश्यक तो शासकीय निधी उपलब्ध करून दिला जाईल.” याशिवाय, शहरातील प्रत्येक घरासाठी ‘वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले असून, यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करामध्ये सवलत देखील मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
5 लाख झाडे लावण्याचा संकल्प – नरेंद्र (बाल्या) बोरकर
सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले की, “शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी आणि नागपूर अधिक सुंदर व पर्यावरणपूरक व्हावे, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे येत्या जुलै महिन्यापासून ५ लाख झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.”
नेल्को सोसायटी त्रिमूर्तीनगर
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात त्रिमूर्तीनगरातील नेल्को सोसायटीच्या मैदानाची साफसफाई करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमोल शामकुळे, माजी नगरसेवक प्रमोद तभाने, महामेट्रोचे अधिकारी अनिल कोकाटे, उद्योजक धनंजय बापट, सकाळ चे संपादक प्रमोद काळबांडे, त्रिमूर्तीनगर टुगेदर वुई कॅन (ट्रा) संघटनेचे पदाधिकारी तसेच नेल्को सोसायटीच्या नागरिकांनी सहभाग या मोहिमेत सहभाग घेतला. या सर्वांनी या मैदानात जमा झालेला केरकचरा साफ केला व परिसर स्वच्छ केला. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागरिकांशी संपर्क साधून या परिसरातील उद्यानाच्या संदर्भात समस्या जाणून घेतल्या तसेच लोकांनी सहभाग नोंदवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. या मोहिमेत परिसरातील प्रवीण मोहोड, तुषार कोठारी, विवेक वैद्य, अमोल गांजापुरे, शिल्पा जोशी, कल्पना जैन, प्रियंका मोहोड यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.

शास्त्री लेआऊट उद्यान
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत साफलेआऊटमधील उद्यानात आज (ता. ८) साफसफाई करण्यात आली. यात नागरिकांसोबत ग्रीन व्हीजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सुद्धा सहभाग नोंदविला. यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सभापती लक्ष्मी यादव, स्थापत्य व विशेष प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, उपायुक्त निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव, ग्रीन व्हीजीलचे कौस्तव चॅटर्जी, सुरभि जयस्वाल, मेहूल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णूदेव यादव, श्रीया जोगी, पार्थ जुमडे, तुषार देशमुख, प्रतीक इसमपल्लीवार यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्ती या अभियानत भाग घेतला.
दर्शन कॉलनी, नेहरूनगर झोन
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत नेहरूनगर झोनमधील दर्शन कॉलनीतील उद्यानात साफसफाईची मोहिम राबविण्यात आली. यात नेहरूनगर झोनच्या सभापती सीमा ढोमणे, जलप्रदाय समितीच्या सभापती दिव्या धुरडे इतर नगरसेवक यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी स्थानिक नागरिक सहभाग घेऊन परिसरातील उद्यानाची साफसफाईच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
नाना-नानी उद्यान ,मंगळवारी झोन
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत मंगळवारी झोनमधील राजनगरातील नाना-नानी गार्डनची साफसफाई करण्यात आली. मंगळवारी झोनच्या सभापती श्रीमती सीमा डवरे, नगरसेवक रेखा पाटील यांच्यासह झोनल स्वच्छता अधिकारी श्री. प्रमोद आत्राम, इतर नगरसेवक मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला. . यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. सुगत नगर कॉलोनी मध्ये प्रभाग 10 चे नगरसेवक प्रमोद सिंह ठाकुर, सुनीता तभाने, सरस्वती सलामे यांनी स्वच्छता केली.
दगडी पार्क, रामदासपेठ
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत रामदासपेठ भागातील दगडी पार्कमध्ये स्वच्छता अभियाना राबविण्यात आले. यावेळी धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक सर्व सुनील हिरणवार, नगरसेवक योगेश पाचपोर, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार उपस्थित होते. यावेळी इतर नगरसेवक मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला . यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
मोचीपुरा गार्डन , गांधीबाग झोन
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत गांधीबाग झोनमधील मोचीपुरा गार्डनमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी झोन सभापती श्रीमती उमा देशमुख, नगरसेवक श्रीकांत आगलावे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता गिरीश लिखार यांच्यासह यात प्रभागातील इतर नगरसेवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
महात्मा फुले उद्यान सहयोगनगर
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानाअंतर्गत धंतोली झोनमधील प्रभाग 33 येथील कैकाडी महाराज बॅनर्जी ले-आऊट उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी झोन सभापती श्रीमती भारती बुंदे, नगरसेवक मनोज गावंडे, अंकित चौधरी, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, यांच्यासह यांनी सहभाग घेतला. याशिवाय प्रभाग 35 मधील महात्मा फुले उद्यान सहयोगनगर उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका विशाखा मोहोड यांच्यासह प्रभागातील इतर नगरसेवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी असे आवाहन केले.







