spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 359 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार(ता.8) शोध पथकाने 359 प्रकरणांची नोंद करून 2,10,300 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणी या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 1,000 रूपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 142 प्रकरणांची नोंद करून 56,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 23 प्रकरणाची नोंद करून 2,300 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 53 प्रकरणाची नोंद करून 21,200 रूपयांची वसुली करण्यात आली. दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली.

मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचेहॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स,सर्व्हिस प्रोव्हायडर, इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 34 प्रकरणांची नोंद करून 68,000 रूपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रुपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी / जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी या अंतर्गत 10 प्रकरणाची नोंद करून 10,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा बांधकामाचा मलबा / टाकावू कचरा टाकणे /साठवणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 15,000 रूपयाची वसुली करण्यात आली. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे व बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 80 प्रकरणांची नोंद करून 16,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्यामुळे 4 प्रकरणांची नोंद करून प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू. 20,000 चे दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 11 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 चे दंड वसुल करण्यात आले. विनापरवानगी बांधकामाचे साहित्य साठवून ठेवल्यामुळे 18 प्रकरणांची नोंद करून रू.1,80,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी वेस्ट टाकल्यामुळे 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. जुनी इमारत पाडतांना,अनधिकृत भुखंडावर बोरवेल खणतांना इत्यादी कामे करतांना पर्यावरणाची काळजी न घेतल्याने 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे,कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे 7 प्रकरणाची नोंद करून रू. 35,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे व बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्त करणे 2 प्रकरणाची नोंद करून रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून रू.3,15,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.