spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा नगर परिषद कार्यालय पर्यावरण, वृक्षारोपण

खापा, वार्ताहर :- नगर परिषद कार्यालय, खापा तर्फे शुक्रवार (दि.५) जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या निमीत्याने माझी वसुंधरा अभियान 7.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2026-27 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेत घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. ‘ग्रीन खापा-क्लीन खापा-ब्युटीफुल खापा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमास नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

नगर परिषद प्रशासनाने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनावर भर देण्याचे आवाहन केले. लावण्यात आलेल्या वृक्षांमध्ये विविध भारतीय प्रजातींचा समावेश असून त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नागरिकांनीही अशा उपक्रमांचे स्वागत केले. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमातून निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थी आणि समुदायामध्ये ग्रीन फर्स्टला प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी कर्मचारी यांना घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये नागरिकांची जबाबदारी, लोकप्रतिनिधींची जबाबदारी समजावून सांगण्यात आले. तसेच बल्क वेस्ट जनरेटर (मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे) यांची जबाबदारी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नियमानुसार प्रत्येक घरून ओला, सुका, घातक, सॅनिटरी कचरा अशा चार प्रकारे कचरा स्त्रोतावरच वर्गीकरण करणे बंधनकारक राहील.

याप्रसंगी मुख्याधिकारी सचिन राऊत, नगराध्यक्ष पीयूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती रोशनी शेखर डेरे, नगरसेवक गणेश आके, आशिष ढाले, संजय सोनकुसळे, किशोर आष्टणकर, मिलिंद बुरडे, प्रशांत तुमाने, निखिल आष्टणकर, नामदेव गजभिये, रवी परतेती नगरसेविका वैशाली लिखार, प्रेमीला बोकडे, मनोरमा श्रीयाम, कविता धराळे, अंजली मेनकुदळे, वैशाली लाड, शोभा कारणकर, निशा कठौते, लीला बागडे, पुष्पेंद्र शर्मा, छगन कवडे तसेच प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, राहुल चव्हाण, राहुल बावनकुळे, प्रदीप परतेती, गोदरेज फीडबॅक फाउंडेशनचे जितेंद्र पासवान, सुजल धनोरे, मनोज बडवाईक, सचिन कोल्हे, प्रदीप रेवतकर, तसेच शहरातील महिला बचत गट उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.