spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नदीच्या पात्रात सराव अन् जिल्हा स्पर्धेत यश! ३ वर्षांच्या विभूधा बारसेने पटकावला दुसरा क्रमांक

हंसराज, भंडारा :- ॲक्वॉटीक असोसिएशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य जलतरण स्पर्धेत एका ३ वर्षांच्या चिमुकलीने आपल्या जलकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २ ते ४ वर्षे वयोगटात सहभागी झालेल्या विभूधा सुभाष बारसे हिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.

विभूधाचे हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे, कारण ती कोणत्याही आधुनिक स्विमिंग पूलमध्ये सराव न करता थेट वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात पोहण्याचा नियमित सराव करते. वैनगंगेच्या लाटांशी झुंज देत दररोज सराव करण्याची तिची जिद्द आणि चिकाटी या जिल्हास्तरीय स्पर्धेत कामी आली.

अवघ्या ३ वर्षांच्या वयात नदीच्या पात्रात सराव करून स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विभूधाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल ॲक्वॉटीक असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि जिल्हावासीयांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात जलतरण क्षेत्रात ती जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular Articles