spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले

सातारा :- कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 36 वर्षीय पत्नीचे पंचवीस वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते, त्यात अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला कॉन्ट्रॅक्ट किलरकडून संपवल्याचं समोर आलं आहे, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पत्नीनेच मारेकऱ्यांना सर्व माहिती पुरवली असल्याचं तपासात समोर आलं आहे.

ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले या कराड येथील अभियंत्याच्या खुनाचा उलगडा झाला आहे.अभियंत्याच्या पत्नी, मेव्हुण्यानंतर आता अल्टो गाडीखाली चिरडणाऱ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलरना कराड पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने आपला 25 वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात याला तीन लाखाची सुपारी दिली होती. प्रियकराने आपला साथीदार आकाश होनसुरे यांच्या मदतीने अभियंता लक्ष्मण मंडले याला क्रूरपणे चिरडले. या खून प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून कॉन्ट्रॅक्ट किलराना पत्नीने माहिती पुरवली होती.

नेमकं काय घडलं?

जलसंधारण विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या खुनाच्या प्रकरणात पत्नीसह मेहुण्यास ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणातील प्रत्यक्ष कारने लक्ष्मण मंडले यांना चिरडून ठार मारून फरार झालेल्या पत्नीच्या प्रियकरासह साथीदारास कराड पोलिसांनी रविवारी (ता ७) रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणात पत्नीने प्रियकराशी असलेल्या प्रेमसंबंधातून व पतीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासातून ३ लाख रुपये देऊन पतीला ठार मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात, (वय २५, रा. कार्वे, ता. कराड), साथीदार आकाश अशोक होनसुरे, (वय २३, रा. कल्पतरु कॉलनी, श्रीराम अपार्टमेंटजवळ, थोरात हॉस्पिटलजवळ, कार्वे नाका, ता. कराड) अशी आणखी दोघांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी याप्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) हे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. शहापूर (जि. ठाणे) येथे नोकरीस असलेल्या मंडले यांचा ६ जून रोजी पहाटेच्या वेळी कराडमध्ये कारने चिरडून खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी पत्नीकडून चौकशी केली त्यानंतर घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला.

पत्नीचे अन् २५ वर्षीय तरूणाचे २०२३ पासून प्रेमसंबंध

तपासादरम्यान पोलिसांनी मृताची पत्नी सारिका लक्ष्मण मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना अटक केली आहे. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सारिका मंडले हिची २०२३ साली कापड दुकानात प्रथमेश थोरात याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीतून पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

तर पतीला संपवसाठी प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे याच्यासोबत कराडातून एक कार घेतली. ५ जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाणेहून कराडकडे येत असल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती. पहाटेपासून पत्नीने त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती घेतली. हीच माहिती तिने आपल्या प्रियकराला पुरविली. कोल्हापूर नाका परिसरात उतरून पायी घरी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना संपवलं.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.