खापा, वार्ताहर :- तालुक्यातील दुर्गम भागातील नागलवाडी येथे (५ जून) ला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त बँड पथकसह वृक्षदिंडी करण्यात आली. अंबुजा फाउंडेशनच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पर्यावरण पुरक शेती, वाढते प्रदूषण, अवैध वृक्षतोड, वाढते औद्योगीकरण, मानवी प्रकृतीवर होणारा परिणाम हे पथनाट्याच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.
याप्रसंगी वनवसाहत मधील हिरकणी कक्षात व जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी ईलनकर, क्षेत्र सहाय्यक सुनील भोयर, वनरक्षक खोडके, के. एम. नेवारे, तर अंबुजा फाउंडेशनचे निलेश हजारे, सागर भोयर यांच्यासह फाउंडेशनचे सभासद उपस्थित होते.

इसाफ बँकेचे फील्ड व्यवस्थापक अमित दास, शाखा व्यवस्थापक रुचिता निंदेकर, निहाल चव्हाण, चंद्रशेखर टेकाम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दिपाली ठाकरे, उपसरपंच भारती उईके, ग्रामसेवक डंबारे, आरोग्य सेवक अक्षय खंडाळे, आरोग्य सेविका मीनल मून आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभु कारोकार तर आभार आयुषा कोवाची हिने मानले. आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.







