– पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मनपाचे विशेष अभियान
– शहरातील 117 खेळाच्या मैदानांची केली साफसफाई
नागपूर :- सुदृढ व निरोगी युवा पिढी घडविण्यासाठी शहरातील मैदानांमध्ये खेळण्यासाठी सर्व उपलब्ध करून देताना या मैदानाची सफाई करण्यासाठी पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त (ता. 9) नागपूर महानगरपालिकेने शहरातील 117 खेळांच्या मैदानाची साफसफाई करण्याची अभिनव मोहिम राबविली. महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, एमआयएम गटनेता शकील पटेल, मुस्लीम लीगचे गटनेता अस्लम मुल्ला खान, शिवसेनेचे गटनेता गणेश चर्लेवार यांच्या नेतृत्वात मैदानांची साफसफाई करण्यात आली. यात लोकांचा सहभाग तर मिळाला तसेच नरेंद्र नगरातील लक्ष्यवेध दिव्यांग स्पोर्ट्स अकादामीच्या मैदानावर दिव्यांग खेळाडूंनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला. अपंगत्वावर मात करून जिद्दीने शहरातील दिव्यांग खेळाडू क्रीडा क्षेत्रात नागपूरचा नावलौकिक वाढवित आहेत परंतु मैदानाच्या साफसफाईच्या मोहिमेतही या दिव्यांगांनी आपला वाटा उचलून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे.
5 जून ते 21 जूनपर्यंत शहरात पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे. याच साखळीत आज (ता. 9) शहरातील खेळाची मैदाने, स्टेडीयम व क्रीडा संकुले व परिसराची स्वच्छता करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सकाळ पासून साफसफाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबत परिसरातील युवक व ज्येष्ठ, नागरिक व महिलांनी स्वयंस्फूर्तीने वाटा उचलला. 

शहरातील सर्व झोनमधील मैदानांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत लक्ष्मीनगर झोन समिती सभापती लक्ष्मी यादव, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, मंगळवारी झोन सभापती सीमा डवरे, हनुमाननगर झोन सभापती ज्योती देवघरे, धंतोली झोन सभापती भारती बुंदे, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, गांधीबाग झोन सभापती उमा देशमुख, सतरंजीपुरा झोन समिती सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती महेश्वरी बिसेन, आशीनगर झोन सभापती आसिफ शेख, परिवहन विशेष समिती सभापती मंगला खेकरे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती संतोष देवी लढ्ढा, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, जलप्रदाय समितीच्या सभापती दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे यांच्यासह उपसभापती सुधीर राऊत, प्रदीप पोहाणे, श्रीकांत आगलावे, ॲङ संजय बालपांडे, संजय चावरे, विजय झलके, सुनील हिरणवार संबंधित प्रभागातील नगरसेवक व झोन अधिकार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी झोनचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
मैदाने स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे – महापौर
खेळाची मैदाने, क्रीडा संकुले आणि स्टेडियम परिसर स्वच्छता अभियानांतर्गत हनुमाननगर झोनमधील महावीर मैदानावरील साफसफाई मोहिमेत भाग घेतल्यानंतर महापौर निता ठाकरे यांनी स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंशी संवाद साधला. या प्रसंगी नगरसेविका मंगला म्हस्के, नगरसेविका मानसी सिमले, नगरसेवक चंद्रकांत खंगार, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर आणि झोनल स्वच्छता अधिकारी दिनेश कलोडे प्रामुख्याने उपस्थित होते. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी मैदानाची साफसफाई करून सक्रिय सहभाग नोंदविला.
शहरातील मैदाने सुंदर आणि आकर्षक असावीत, तसेच नागरिकांना तिथे व्यायामासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व ओळखून. खेळाची मैदाने आपलीच मानून त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे. मैदानांमुळे नागरिकांना विविध खेळ खेळण्याची आणि व्यायाम करण्याची चांगली संधी मिळते. याचा प्रत्येकाला आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी मोठा फायदा होतो. शहरातील मैदानांमध्ये खेळांची सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचेही महापौर ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महापौर ठाकरे यांनी मैदानावर विविध स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक क्षमता चाचणीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महावीर मैदानाच्या पायाभूत विकासासाठी आवश्यक असलेली संरक्षक भिंत, प्रसाधनगृह, मैदानाचे सपाटीकरण आणि दिव्यांची सोय यांसह इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. क्रीडा समिती सभापती सौ. दर्शनी धवड यांनीही युवक-युवती आणि नागरिकांशी संवाद साधत १४ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ई-वेस्ट’संकलन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
दिव्यांगांची सामाजिक बांधिलकी
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील खेळाची मैदान, स्टेडीयम व क्रीडा संकुले व परिसराची स्वच्छता अभियान आज (ता. 9) संपूर्ण शहरात राबविण्यात आले. धंतोली झोनमधील नरेंद्रनगरातील लक्ष्यवेध दिव्यांग स्पोर्ट्स ॲकेडमीमध्ये लोकसहभाग व ग्रीन व्हीजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेवक रमेश भंडारी, नगरसेविका पूजा भूगावकर, उपायुक्त राजेश भगत, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे, झोन अधिकारी राजेश गायधने, लक्ष्यवेध दिव्यांग स्पोर्टर्स ॲकेडमीचे विनय उपासणे, ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभि जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, प्रिया यादव, पार्थ जुमडे, पिनाकी बानिक व प्रतीक इसमपल्लीवार यांच्यासह मैदानावर इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
याशिवाय शहरातील सर्व झोनमधील विविध मैदानांवर साफसफाईची मोहिम लोकांच्या सहभागातून राबविण्यात आली. यात संबंधित प्रभागातील नगरसेवक-नगरसेविकांनी सहभाग नोंदविला. यात नगरसेवक प्रवीण गिरे, नगरसेवक, नगरसेवक विनोद कन्हेरे, नगरसेवक योगेश पाचपोर,नगरसेवक शुभम मोटघरे, नगरसेविका रजनी वानखेडे, नगरसेवक निलेश गायधने, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त व नगरसेवक शेषराव गोतमारे, नगरसेविका निरंजना पाटील, नगरसेवक रामदास साहू , नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेविका वर्षा चौधरी, नगरसेविका अर्चना पडोळे, नगरसेवक श्रीकांत आगलावे, तसेच प्रत्येक झोनमधील अधिकार्यांनी या मोहिमेत भाग घेतला.
आज धार्मिक स्थळांची स्वच्छता
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज (ता. 10) शहरातील सर्व धर्मीय धार्मिक स्थळांची साफसफाई केली जाणार आहे. या मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी व धार्मिक स्थळांच्या संचालकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.







