spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीच्या विजयाचा निर्धार 

कामठी :- नागपूर विधानपरिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या प्रचारार्थ कामठी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे भाजपा नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत संवाद सभा पार पडली.या बैठकीत संघटनात्मक बांधणी,प्रचाराची दिशा तसेच कार्यकर्ते च्या जवाबदाऱ्याबाबत विचारमंथन करण्यात आले. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांनी उपस्थित उपस्थितांशी संवाद साधला व विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित भाजपा महायुतीच्या विजयाचा निर्धार केला .

या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटी, प्रभावी नियोजन आणि महायुतीच्या विजयासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत , सुधाकर कोहळे, . अरविंद गजभिये, अनिल निधान,अजय बोढारे,राहुल किरपान, रिंकेश चवरे, शुभांगी गायधने, टेकचंद सावरकर तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि भाजपा महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Popular Articles