spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरकारची कर्जमाफी केवळ धूळफेक – हुकूमचंद आमधरे

कामठी :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजना ही केवळ दिखावा आहे.या योजनामध्ये शब्दछळ करून नियम ,अटी व शर्ती टाकून बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवले असून ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा सरसकट कोरा करावा अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हुकूमचंद आमधरे यांनी केली आहे. शेतकरी अडचणीत अडकला आहे पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे वस्तू चे बाजार भाव वाढले असून रासायनिक खते व बियाणे साठी शेतकऱ्यांना पहाटे पाच वाजेपासून रांगेत उभे राहावे लागते तसेच ट्रेकटर साठी लागणाऱ्या डिझेल पेट्रोल साठी पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. शेतकरी अडचणीत अडकला असून शासन शेतकऱ्यांप्रति उदासीन दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही.याची शोकांतिका आहे. राज्य सरकारने ही कर्जमाफी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या व हे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्ज घेतलेले असून हे कर्ज थकीत झाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळू शकत नाही असे सर्व शेतकरी या योजनापासून वंचित आहेत.जाहीर झालेल्या कर्जमाफी मधून लाभ घेणाऱ्या कर्जमाफी मधून लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुपटीपेक्षा जास्त आहे.त्यामुळे थकीत असलेल्या थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. फडणवीस सरकारची ही कर्जमाफी योजना फक्त पीककर्ज व पुनर्गठीत कर्ज या कर्जासाठी जाहीर झालेली आहे अनेक शेतकऱ्यांनी विहीर,पाईपलाईन व गाइ म्हशिसाठी कर्ज घेतले आहे ते सुद्धा थकीत आहेअसें सर्व शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहेत ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा हुकूमचंद आमधरे यांनी दिला आहे.

Popular Articles