spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिर्डीत साईभक्तांच्या जीवाशी खेळ; IAS तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मोठी कारवाई

अहिल्यानगर :- गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलंय. तुकाराम मुंडेंनी FDA ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अख्खा महाराष्ट्रातले माफियांचे, भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. प्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले. साईभक्तांनी बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन तातडीने खडबडून जागे झाले असून ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाविकांच्या आरोग्याशी खेळ

अनेक वर्षांपासून अक्षरशः दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री केली जात आहे. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचं देखील दिसून येत आहे. प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झालं आहे. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होतोय..

विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाईला सुरूवात

साईबाबांच्या शिर्डीत बोगस पेढा प्रसाद विक्री होत असल्याची बातमी समोर येताच प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. . शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून पेढे आणी इतर खाद्यपदार्थाचे नमुने घेण्याचं काम सुरू आहे.. नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार असून दोषी आढळल्यास विक्रेते आणी उत्पादकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.