– ६ आरोपी अटक; ६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- न्यु मच्छी मार्केट परिसरातील जुनी कन्हान -पिपरी नगरपरिषदेच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्यावर कन्हान पोलिसांनी धाड टाकुन सहा आरोपीं ना ताब्यात घेतले. या कारवाईत ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार मंगळवार (दि. ९) जून ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयं ती मंडवधरे या आपल्या पथकासह परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, न्यु मच्छी मार्केट परिसरातील जुनी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या मागे काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांवर जुगार खेळत आहेत. माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच काही इसम पळुन गेले. त्यांचा पाठलाग करण्यात आला मात्र ते हाती लागले नाहीत. कारवाई दरम्यान पोलिसांनी विकास नेवालाल भिसे (३०), रॉकी सुरेश गायकवाड (वय ३४), अश्विन नंदु शेंडे (३२) तिघेही रा. सत्रापुर, कन्हान, अशोक सुखदेव खोब्रागडे (७०) रा. शिवनगर, कन्हान, शुभम नामदेव रंगारी ( २३) रा. नगरपरिषद परिसर, कन्हान व दीपक शंकर खंगार ( ३२), रा. पटेलनगर कन्हान यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझड ती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे ५२ ताशांचे पत्ते तसेच डावावरील १ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकुण ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकारी फिर्यादी पोलीस कर्मचारी आकाश सिरसाट यांच्ये तक्रारीवरून सहाही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.








