नागपूर :- श्रीराम योगा ग्रुप आणि योग संस्कार शिबिर यांच्या संयुक्त विद्यमाने अमरनगर येथील समाजभवन, श्री गजानन मंदिर सभागृहा जवळ आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क योग संस्कार शिबिराची गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. ४ ते ११ जून या कालावधीत आयोजित या शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात योगासने, प्राणायाम, ध्यान, आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याबाबत सखोल माहिती देण्यात आली. या शिबिराचे मार्गदर्शन योगशिक्षक नरेश चिंतामणराव भांदककर यांनी केले. त्यांना श्रीकृष्ण इंगोले, चंद्रकांत खोडे, कडू , गंगाधर पराते, अरुणा पोटभरे आणि डॉ. स्वाती राठोड यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास आगरकर, वसंतराव इझनकर, जया रासेकर, गणपतराव निंबाळकर, हिरुळकर, धवल, भोयर, घोरमाडे तसेच रमेश जिल्हारे यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे सांगून नागरिकांनी योगाला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
नि:शुल्क योग संस्कार शिबिराची यशस्वीपणे सांगता


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.






