spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वरनाद सुर संग्राम २०२६ चा ग्रँड फिनाले उत्साहात संपन्न

– आशीष कैथवास विजेता; निकिता वासनिक प्रथम उपविजेती, पलक वानखेडे द्वितीय उपविजेती

नागपूर :- ‘कॉस्मिक कल्चरल इव्हेंट्स, नागपूरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धा ‘स्वरनाद सुर संग्राम २०२६’ चा भव्य ग्रँड फिनाले नुकताच, ६ जुन २०२६ रोजी, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगीत प्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. स्पर्धेत उत्कृष्ट गायन कौशल्याचे प्रदर्शन करत आशीष कैथवास यांनी विजेतेपद पटकावले. निकिता वासनिक यांनी प्रथम उपविजेतेपद, तर पलक वानखेडे यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळविले. सांत्वन पुरस्कार अनघा लोनारे, डॉर्फी जनबंधू, तनिष गजभिये, सचिन शिवपुरे आणि सतीश दामोदरे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आयोजक सारिका खडसे यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पजाई, डॉ. रश्मी तिरपुडे, पूजा ठाकूर राजोरिया, वृंदा ठाकरे, शैलेश शिरभाते, रेणुका काटे तसेच झाडे उपस्थित होते. मान्यवरांनी स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी MY FM चे आरजे (RJ) यांनीही उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढविले तसेच कार्यक्रमाच्या यशाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक तेजस्विनी खोडतकर आणि कृती बक्सी यांनी केले. स्पर्धकांच्या सूर, ताल, उच्चार, सादरीकरण आणि एकूण कलात्मकतेच्या आधारे निष्पक्षपणे निकाल जाहीर करण्यात आला. ग्रँड फिनालेमध्ये राहुल तुमसरे, स्वाती थोरात, रजनी गेडाम आणि राजेश झाडे यांनी सादर केलेल्या आकर्षक मेडली परफॉर्मन्सने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्यांच्या सुमधुर सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन संगीता तांबोळी यांनी तर संपूर्ण ध्वनी व्यवस्था स्वरनाद म्युझिकल स्टुडिओ यांनी सांभाळली असून, साऊंड इंजिनिअर रुचिर झाडे यांनी उत्कृष्ट ध्वनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. समारोप प्रसंगी आयोजक सारिका खडसे यांनी सर्व स्पर्धक, परीक्षक, प्रमुख पाहुणे, सहकारी आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले. संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यभरातील गुणी गायक – गायिकांना एकत्र आणणारा ‘स्वरनाद सुर संग्राम २०२६’ हा कार्यक्रम नागपूरच्या सांस्कृतिक विश्वात एक वेगळी छाप उमटविणारा आणि संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.