spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिहोरा पोलिसांचा दणका: ७२ हजारांचा अवैध मोहफूल सडा जप्त; एकावर गुन्हा दाखल

– दावेझरी येथे पोलिसांची मोठी कारवाई; ३६० किलो मुद्देमाल हस्तगत

हंसराज,भंडारा सिहोरा :- सिहोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या मोहफुलांच्या सड्यावर (मोहपास) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुमसर तालुक्यातील दावेझरी येथे टाकलेल्या छाप्यात एकूण ७२,००० रुपये किमतीचा ३६० किलो सडलेला मोहपास जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दावेझरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मोहफुलांचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार गयगये यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिहोरा पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, नंदलाल अशोक तांडेकर (वय ४५, रा. दावेझरी, ता. तुमसर) याच्या ताब्यात अवैध मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत प्रत्येकी ३० किलो मोहपास भरलेली एकूण १२ प्लास्टिक पोती जप्त केली. एकूण ३६० किलो सडलेल्या मोहपासाची किंमत प्रति किलो २०० रुपयांप्रमाणे ७२,००० रुपये इतकी आहे. या प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात आरोपी नंदलाल तांडेकर याच्याविरुद्ध अपराध क्रमांक २७१/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई: सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश गोरे, पोलीस निरीक्षक बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गयगये आणि पोलीस शिपाई पोरटे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Popular Articles