spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्या देशमुखने साध्य केलेल्या विजयातून नागपूरसह भारताचा गौरव

विश्वविजेती दिव्या देशमुखचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन

नागपूर दि. २९ :- ‘संयम, जिद्द आणि बुध्दीचाणक्षता या महत्त्वपूर्ण कौशल्याच्या बळावर आपल्या नागपूरच्या  दिव्या देशमुखने साध्य केलेल्या जागतिक यशातून विदर्भासह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला  गौरवान्वित केले आहे’ या शब्दात राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्याचे अभिनंदन केले. तिच्या माध्यमातून नागपूरच्या साऱ्या लेकींच्या मनात आपण विजयी झाल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला असेल यात शंका नाही असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले. जॉर्जिया येथे झालेल्या “FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025” स्पर्धेत दिव्या व कोनेरु हम्पी यांच्यातील ही लढत एका संयमाची, अचूक खेळीची प्रचिती होती. टायब्रेक मध्ये दिव्याने रॅपीड फॉरमेंटमध्ये कोनेरु हम्पीचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणाऱ्या या दोन्ही महिला भारतीय असणे हा आपल्या भारताचा गौरव आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा क्षण आहे. या विश्वविजयी कामगिरीसाठी दिव्या देशमुख व तिच्या यशासाठी मेहनत घेणाऱे प्रशिक्षक – मार्गदर्शक तसेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.

Popular Articles