spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बार्टी आणि आर्टीच्या पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

नागपूर, दि. २९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने अनिवासी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. यात पास झालेल्या उमेदवारांचा मेरीट लिस्टनुसार प्रवेश निश्चित केल्या जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांना शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, याउद्देशाने बार्टी व आर्टी या संस्था पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात. या प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना केवळ शारीरिकच नव्हे तर लेखी परीक्षेसाठीही आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
प्रशिक्षणासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील बार्टीच्या http://barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेश परीक्षेतील (सीईटी) गुणांच्या आधारे निवड करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम नियंत्रण व अंमलबजावणी समितीकडे असल्याचे बार्टीमार्फत कळविण्यात आले आहे.

Popular Articles