spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विश्व रक्तदाता दिनानिमित्त IMPF चा यशस्वी रक्तदान शिबिर, 70 युनिट रक्तसंकलन

नागपूर :- विश्व रक्तदाता दिनानिमित्ताने इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन (IMPF) नागपूरच्या वतीने मोमीनपुरा येथील अन्सार कम्युनिटी हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात 70 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून 70 युनिट रक्त संकलित करण्यात आले. या रक्ताचा लाभ सुमारे 210 गरजू रुग्णांना होणार असून अनेकांचे जीव वाचविण्यास ते उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाला नगरसेवक वसीम खान, डॉ. मोहम्मद फैजल (विभागप्रमुख, अस्थिरोग विभाग, IGMC) तसेच सीए दाऊद खान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे सांगितले आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आयुष ब्लड बँकेच्या तांत्रिक सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. IMPF च्या पदाधिकाऱ्यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक सेवाभावी उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Popular Articles