spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मृद व जलसंधारण विभाग सचिवांचा भंडारा दौरा; जिल्ह्यातील अभिनव बंधाऱ्याची केली पाहणी, प्रशासकीय कामांबाबत व्यक्त केले समाधान

हंसराज भंडारा :- जलसंधारण विभागाचे सचिव पापळकर यांचा भंडारा जिल्ह्याचा दौरा पार पडला. या दौऱ्यात सचिवांनी मौजा चिखली येथील पुलवजा बंधारा, मिरेगाव येथील मा.मा. तलावाचे ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काम, भूगाव येथील अस्तित्वातील पुलालगत बंधाऱ्याचे बांधकाम आणि साकोली येथील क्षतिग्रस्त माजी मालगुजारी तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त करून अभियंत्यांना कामाचा दर्जा राखण्याचे निर्देशित केले.

लाखनी तालुक्यातील भूगाव येथे चुलबंद नदीवरील विद्यमान पुलालगत व्ही.एन.आय.टी. नागपूरच्या मार्गदर्शनातून किफायतशीर व दर्जेदार बंधारा उभारण्यात आला आहे. तब्बल ५९९ टीसीएम (TCM) पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने भरेल या नियोजनाबाबत सचिवांनी या बंधाऱ्यापासून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त केले

दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषद ) यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील योजनांच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा केली. तसेच भंडारा मृद व जलसंधारण विभागीय कार्यालयास भेट देऊन सर्व योजनांची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन दैनंदिन कामामध्ये AI व GISचा वापर करण्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देत मार्गदर्शन केले.

या दौऱ्याप्रसंगी विभागाचे मुख्य अभियंता अनंत जगताप, अधीक्षक अभियंता हनुमंत खटके तसेच महेश सेलुकर, कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, संजय चाचिरे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, विभागातील उपअभियंता व क्षेत्रिय स्तरावरील अभियंते उपस्थित होते. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक गती मिळणार आहे.

Popular Articles