नागपूर, दि. २९ : नागपूर शहर व ग्रामीण तहसील मधील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन अधिसूचना 7 डिसेंबर 2023 अन्वये “महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-2023 1 डिसेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 20 टक्के व त्यावरील देय दंडाच्या रक्कमेमध्ये 80 टक्के सवलत प्रदान करण्यात आलेली होती. परंतु सदर कालावधीमध्ये ज्यांनी अर्ज सादर करुन सदर योजनेचा लाभ घेतलेला नाही व त्यामुळे सदरची प्रकरणे प्रलंबित आहे त्यांच्यासाठी महाराष्ट शासन, महसूल व वन विभाग यांच्याकडील 21 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुन्हा दिनांक 21 जुलै 2025 ते 20 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये मुद्रांक शुल्काच्या रक्कमेमध्ये 20 टक्के व त्यावरील देय दंडाच्या रक्कमेमध्ये 80 टक्के सवलत लागू करुन सदरची रक्कम शासन जमा करुन आपला दस्त योग्य मुद्रांकीत करुन घेण्याची संधी प्रदान केलेली आहे. त्यासाठी प्रलंबित प्रकरणातील पक्षकारांनी वाढीव योजनेचा भरघोस लाभ घ्यावा. अन्यथा संपूर्ण देय मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन महसूल थकबाकी म्हणून दिनांक 21 ऑगस्ट 2025 पासून सक्तीने वसूलीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजनेअंतर्गत मुदतीत अर्ज केलेल्या पक्षकारांना मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरणा करण्यास मुदतवाढ









