spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध शस्त्र बाळगणारा युवक ताब्यात

– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलिसांची कारवाई

कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोली सांनी कन्हान परिसरात पेट्रोलिंग दरम्यान एका युवकाला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. कारवाईत पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातुन दोन धारदार लोखंडी हत्यारे जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मार्गदर्शनात शनिवार (दि. १३) जुन रोजी रात्री ते रविवार (दि.१४) रोजी पहाटे सकाळी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस कन्हान परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि पिपरी येथे राहणार हिमांशु माहतो हा आपल्या जवळ कोणतातरी गुन्हा करण्याचा उद्देशाने अवैधरित्या हत्यार बाळगत आहे. या माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याचा निवासस्थानी पोहचुन आरोपी हिमांशू मुकेश माहतो (वय २३) रा. वार्ड क्र.३,पिपरी कन्हान यास ताब्यात घेतले. पोलीसांनी युवकाची सखोल चौकशी केली असता चौकशी दरम्यान आरोपीच्या ताब्यातुन दोन धारदार लोखंडी हत्यारे (कोयता व चाकू) जप्त करण्यात आले. जप्त शस्त्रांची अंदाजे किंमत १००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कन्हान पोलीसानी आरोपी हिमांशु माहतो याचा विरुद्ध भारतीय हत्यार काय द्याच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कन्हान पोलीस करित आहेत.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मार्गदर्शनात पोनि अंकुश माने, पोउपनि ओकांर षिरीश रसाळ, सफौ विनोद काळे, पोहवा शैलेश यादव, प्रमोद भोयर, सत्यशिल कोठारे, नितु रामटेक, हरिष सोनभद्रे, अमित यादव, नापोशि संजय भदोरिया, सुमित बांगडे सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Popular Articles