spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी नगर परिषदेकडून अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; रमानगर आरओबी परिसरात कारवाई

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील अनेक भागांमध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने नगर परिषद प्रशासनाने शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजल्यापासून रमानगर आरओबी पुलाजवळील रस्त्याला बाधा ठरणाऱ्या नाल्यांवरील पक्क्या बांधकामांवर धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, उद्या जयस्तंभ चौक ते गांधी चौक या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी बाजार परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी शहरातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शासकीय जागेवर उभारलेले शेड, अस्थायी दुकाने, टिनचे टपरे, पानठेले तसेच रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे संबंधितांनी तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल आणि त्यातून होणाऱ्या नुकसानास संबंधित नागरिक स्वतः जबाबदार राहतील.

आज रमानगर आरओबी परिसरातील अतिक्रमण कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. ही कारवाई मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील प्रदीप भोकरे, गौरव शर्मा आणि शुभम टाकभवरे यांनी पार पाडली.

Popular Articles