spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अकरा वर्षांच्या बहिणीने सहा वर्षिय बहिणीचा प्राण वाचविले

कान्हान २९ : – अकरा वर्षांच्या अनन्या च्या सतर्कतेने, हुशारीने सहा वर्षीय धाकटया बहिणीला इलेक्ट्रिक बोर्ड ला हात लागुन चिपकलेल्या बहिणीला सुरक्षित पणे वाचवले म्हणुन तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही घटना पारशिवनी तहसिलच्या टेकाडी गावातील इंदिरा नगर मध्ये घडली.
कुमारी अनन्या मंगल उईके वय ११ वर्षे इयत्ता ५ वी आणि कुमारी आर्वी मंगल उईके वय ६ वर्षे इय त्ता १ ली या दोघीही जिल्हा परिषद शाळा टेकाडी च्या विद्यार्थिनी असुन त्यांचे पालक रोजंदारीचे काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिव शी दोघेही कामावर गेले होते. अनन्या आणि आर्वी घरी खेळताना आर्वी भिंतीवरच्या लोखंडी खिडकीच्या ग्रिलला धरून उभी होती. तिने उजव्या हाताचे बोट खिडकीजवळ भिंतीवर टांगलेल्या इलेक्ट्रिक बोर्डच्या पिनवर ठेवल्याने जोरदार विजेचा झटका लागल्याने आर्वी ओरडली. वीज प्रवाहामुळे आर्वी बोर्ड आणि लोखंडी ग्रिलला चिपकली. जवळच खेळत असलेल्या अनन्या ला हे लक्षात आल्याने तीही ओरडली. तिने जवळच पडले ला प्लास्टिकचा झाडु उचलला आणि बोर्ड ला चिकटलेल्या आर्वीच्या हातावर जोरात मारल ल्याने बोर्ड ला चिकटलेला हात निसटला. विजेच्या प्रवाहामुळे आर्वी च्या बोटाला गंभीर दुखापत झाली. शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले. सध्या ती सुखरूप आहे. अकरा वर्षांच्या अनन्याने सतर्केतेने दाखवलेल्या वेळेवर धाडसाने धाकट्या बहिणीला विजेच्या प्रवाहापासुन वाचवल्या ने गावातील सर्वजण कौतुक करित आहेत

Popular Articles