spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नागपूर :- भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन येथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २१ जून दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ (Yoga for Healthy Ageing) ही संकल्पना लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. योग सप्ताहा दरम्यान विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी महाविद्यालयाच्या उद्यानात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. तसेच योगाचार्य भारत गुप्ता यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी योग क्विझ, सूर्यनमस्कार स्पर्धा, पोस्टर स्पर्धा तसेच रील (Reel) स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. योग सप्ताहाचा समारोप २१ जून रोजी महावीर नगर ग्राउंड, अझमशाह लेआऊट, नंदनवन येथे आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाने झाला. हा कार्यक्रम आरएआरआय (RARI) तसेच नागपूरातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांच्या सहकार्याने आयोजित केला होता. यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ.माधवी रेहपाडे, डॉ. ममता तलमले, डॉ.ओमप्रकाश गुल्हाने, डॉ.शरयू गजापुरे, डॉ.रुपाली भनारे, डॉ. स्नेहल भामकर तसेच पदव्युत्तर विद्यार्थी शुभम, लक्ष्मी, आस्था, वैष्णवी, सुरभी, तरुणा, तुषार आणि प्रियंका यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

Popular Articles