spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘स्वस्थ वाढत्या वयासाठी योग’ या संकल्पनेतून भिलगावात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कामठी :- भिलगाव येथील माकडे सेलिब्रेशन परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी ‘Yoga for Healthy Aging (स्वस्थ वाढत्या वयासाठी योग)’ ही संकल्पना घेऊन आयोजित कार्यक्रमात 200 हून अधिक योगसाधक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक योगाभ्यास केला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. पुष्पहास बल्लाळ यांनी उपस्थितांना योग आणि निरोगी वृद्धत्व याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुदृढ राहते तसेच वाढत्या वयातही जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला नागपूर ग्रामीणचे तहसीलदार अरविंद हिंगे, यशोधरा पोलीस ठाण्याचे एपीआय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, सुख-शांती समाधानचे श्रीकांत साईरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

योगाभ्यासाचे मार्गदर्शन सनीजी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित योगसाधकांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंभूनाथ शर्मा, शोभाजी, राव साहेब, मनोज कुमार, प्रजापती आणि प्रथम वैद्य लिलेश माकडे यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी खोजेंद्र माकडे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, योगसाधक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.

Popular Articles