spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भागीमहारी जि.प. प्राथमिक शाळेत योगदिन व जागतिक संगीतदिन उत्साहात साजरा

पारशिवनी :- आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दोन्ही दिवस आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात साजरे करण्यात आले.

योगदिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगासने सादर केली. तसेच प्राणायाम आणि ध्यानधारणेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

जागतिक संगीत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूहगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. संगीतामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, सर्जनशीलता वाढते आणि आत्मविश्वास बळकट होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला सरपंच ज्योती भोंडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रेम भोंडेकर, डॉ. बबलू गाढवे, वैद्यकीय अधिकारी दीप्ती पुसदेकर, मुख्याध्यापक रविंद्र चंदनखेडे, शिक्षक तिलक भुते, आशा वर्कर मीना भड यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. योग आणि संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Popular Articles