spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिरसोली येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाला 152 पुस्तके भेट

किशोर साहू, मौदा :- सिरसोली येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय सुरु झाल्यापासून जिज्ञासू विद्‌यार्थाकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संदर्भ वाचन साहित्याची उणीव निर्माण झाली होती. त्याकरिता वाचक वर्गानी मदत मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी निरोप पाठवले.त्यामुळे भारतीय स्टेट बैंक इंडिया शाखा भंडारा येथील व्यवस्थापक आशिष मेंढे यांच्या प्रयत्नाने श्रीमती रजनी वाबगावकर मु.वरोरा यांच्याकडून 152 पुस्तके वाचनालयाला मिळाली.

पुस्तके भेट दिल्यामुळे वाचक वर्गांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी भारतीय स्टेट बैंक ग्राहक सुविधा केंद्र सिरसोली चे संचालक युवराज‌ चाफले, पुस्तके स्विकारतांना वाचनालयाचे पदाधिकारीगण सुमित भुते, जुमदेव वंजारी, विलास निमकर, संकेत जगणीत, प्रफुल निमकर, पायल मदनकर, दिपाली वंजारी, सुहानी तुमसरे आदी वि‌द्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles