spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निष्ठा तू परत ये

कुठे हरवलीस निष्ठा, की तू ध्यानस्त आहे?

मैदानात सत्तेच्या, राज-धिंगाणा सुरु आहे.

उरला नाही आदर, जनतेच्या कौलाचा आता,

खुर्चीसाठी नेत्यांनी, विकले इमान आहे.

विचारधारेला खरीदणारे, संपत आले आता,

भरचौकात लोकशाहीचा, लिलाव सुरु आहे.

रोज बदलतात पक्ष हे, लाजेचे वस्त्र सोडुन,

जे काल होते वैरी, ते आज मित्र आहे.

करतात कानाडोळा, मूलभूत समस्येकडे,

नजरेत त्यांच्या फक्त, सत्तेची मलाई आहे.

खोक्यांच्या राशीवर होतात, मोठे करार इथे,

जनतेच्या स्वप्नांवर, यांचा थेट प्रहार आहे.

बाळकडू पाजले, पोसले ज्यांनी यांना,

त्यांच्यासाठीच आज हे, कृतघ्न आहे.

बंदिस्त केले यांनी, त्याग आणि नैतिकतेला,

लाचारीच यांच्या, धमण्यातून वाहत आहे.

झुंडीने हे चालतात, भ्रष्ट वाटेवर सारे,

स्वाभिमानी लेकरं, तूझ्या प्रतीक्षेत आहे.

कित्येक आहे पदांसाठी, गुलामीत मरणारे,

चारित्र्य जपून लढणारे ही, काही जिवंत आहे.

म्हणून सांगतो निष्ठा, तू मौन धरू नको,

निर्दयी राजकारणाचा, तुला ताबा घेणे आहे.

आश्वासनांतून नको, निष्ठा तू कृतीतून ये,

गद्दार पुढाऱ्यांना, लायकी दाखवायची आहे.

– प्रा. विलास डोईफोडे , सावनेर

Popular Articles