spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महात्मा फुले शिक्षण संस्थेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे शुक्रवारी २६ जून रोजी सामाजिक न्यायाचे प्रणेते व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिचाटे व सहचिटणीस रमेश राऊत यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संस्थेचे सरचिटणीस रवींद्र अंबांडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनीही शाहू महाराजांच्या सामाजिक समता, शिक्षण व लोककल्याणाच्या कार्याला आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला थोर महापुरुषांची जयंती /स्मृतिदिन समारोह समितीचे संयोजक राजेंद्र पाटील, सहसंयोजक प्रा.डॉ.अभिजित पोतले, संचालक देवेंद्र काटे, प्रा.पंकज कुरळकर तसेच संस्थेचे कर्मचारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Popular Articles