spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे कामठी शहर शिवसेनेतर्फे जल्लोषात स्वागत

कामठी :- राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या नागपूर आगमनावेळी कामठी शहर शिवसेनेच्या वतीने नागपूर विमानतळावर उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ अर्पण करून आपल्या पक्षप्रमुखांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी कामठी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी राजकीय घडामोडी, पक्ष संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

स्वागतप्रसंगी कामठी तालुका प्रमुख राजू चहांदे, शहर प्रमुख मुकेश यादव, , कामठी तालुका अल्पसंख्याकप्रमुख मनसा,पटेल, ,सतीश गणवीर, महेश तालेबार,रीतेश कुमार,पाटिल,कमल सकतेल, गिलीस शुक्ला,श्रीकांत ,राउत,नरेश नायडू,महादेव, बाबंकर, अजेय, डोगरे,उपस्थित शिवसैनिकांनी पक्षाशी असलेली निष्ठा व्यक्त करत आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागपूर विमानतळ परिसर शिवसेनेच्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत सोहळा संपन्न झाला.

Popular Articles