नागपूर :- जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्म तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या नागपूरच्या हितेन धारपुरे यांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी गडकरी यांनी हितेनच्या अभिनव संशोधनाचे कौतुक करत, अशा तरुण संशोधकांमुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावत असल्याचे सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रात युवकांनी अधिक संशोधन करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी हितेनला प्रोत्साहन दिले. हितेन धारपुरे यांनी विकसित केलेल्या जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक हितेन धारपुरे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींकडून कौतुक









