spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीकृष्ण नृत्यालयाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय ‘युवा कलोत्सवा’त मोहिनीयट्टमची मोहक प्रस्तुती

नागपूर :- नागपूर येथील सुप्रसिद्ध श्रीकृष्ण नृत्यालयच्या विद्यार्थिनींनी मध्यप्रदेशातील सागर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘युवा कलोत्सव २०२६-२७’ मध्ये मोहिनीयट्टम नृत्याची अप्रतिम प्रस्तुती सादर करून रसिकांची मनं जिंकली. १९ व २० जून २०२६ रोजी, सागर (मध्यप्रदेश) येथील महाकवी पद्माकर सभागृहात हा राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि जिल्हा पुरातत्त्व, पर्यटन व संस्कृती परिषद, सागर (मध्यप्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील युवा शास्त्रीय व लोक कलावंतांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच महोत्सवाचा उद्देश होता.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत श्रीकृष्ण नृत्यालयाच्या डॉ. हनी उन्नीकृष्णन, यामिनी सुंदरम आणि अनखा अनिल यांनी २० जून रोजी मोहिनीयट्टम या केरळच्या पारंपरिक शास्त्रीय नृत्यशैलीची अत्यंत देखणी प्रस्तुती सादर केली. त्यांच्या लयबद्ध हालचाली, भावपूर्ण अभिनय आणि सादरीकरणाने उपस्थित मान्यवर, कलारसिक व प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. श्रीकृष्ण नृत्यालयाच्या संचालिका प्रमिला उन्नीकृष्णन यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, युवा कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली तसेच सागर जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Popular Articles