कन्हान :- श्री हनुमान मंदीर देवस्थान खदान रोड कांद्री-कन्हान व्दारे ग्राम पंचायत टेकाडी कोळसा खदान उपसरपंच पद्दी त्रिभुवन ओमप्रका़श सिंह यांची सर्वानुमते निवड झाल्याने स्वागत, सत्कार करण्यात आला.
शनिवार (दि. २७) जुन ला श्री हनुमान मंदीर देवस्थान खदान रोड कांद्री-कन्हान येथे सकाळी आरती व प्रसाद वितरण करून ग्राम पंचायत टेकाडी कोळसा खदान उपसरपंच पद्दी त्रिभुवन ओमप्रका़श सिंह यांची सर्वानुमते निवड झाल्याने देवस्थान व्दारे कवडु आकरे यांचे हस्ते श्री हनुमान भक्त त्रिभुवन ओमप्रकाश सिंह हयाना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित भाविक मंडळीचे स्वागत करून फुलाच्या वर्षावात “जय श्रीराम”, “जय हनुमान ” चा जयघोष करित जल्लोष करण्यात आला . तदंतर उपस्थित मंडळीना अल्पोहार, चाय आणि प्रसाद वितरण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता श्री हनुमान मंदीर देवस्थान खदान रोड कांद्री-कन्हानचे कवडु आकरे, रामा हिवरकर, वामन देशमुख, राधे राधे, मारोती आष्टनकर, गोल्डी पोटभरे, सुनील प्रजापती, वासुदेव आकरे, मनोज कश्यप, विश्वकर्मा, उषा वाडीभस्से, उषा वंजारी, सुनिता हिवरकर, सुमित्रा किरपान, मंगला कामडे, मालती वांढरे, इंदिरा मंसुहरे, इंदु टेंभरे सह भाविक मंडळीने उपस्थित राहुन सहकार्य केले.




