spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ग्रेस डी-अॅडिक्शन सेंटरतर्फे जनजागृती

बुटीबोरी / नागपूर :- आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी व बेकायदेशीर तस्करी प्रतिबंध दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियान अंतर्गत द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रेरणेने बुटीबोरी येथील ग्रेस डी-अॅडिक्शन सेंटरतर्फे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अर्चना भारती आणि अभय भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविणे आणि व्यसनमुक्तीसाठी सामूहिक जनजागृती निर्माण करणे हा होता.

ग्रेस डी- ॲडिक्शन सेंटरने समुपदेशन, ध्यान, मानसिक स्वच्छता (मेंटल हायजीन) आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली या सर्वसमावेशक पद्धतीच्या माध्यमातून देशभरातील १,५०० हून अधिक व्यक्तींना व्यसनमुक्त होण्यासाठी यशस्वीपणे मदत केली आहे. कार्यक्रमात परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या “Grace has the ability to change anything” (कृपा कोणतीही गोष्ट बदलण्याची क्षमता ठेवते) या विचाराचा विशेष उल्लेख करण्यात आला. या तत्त्वज्ञानातून व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन, मानसिक बळ आणि आधार देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा ग्रेस सेंटरचा संकल्प अधोरेखित करण्यात आला. यावेळी द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका डॉ.मौसम फिरके, डॉ.नेहा फिरके, डॉ.अर्चना भारती तसेच प्रिन्स जुनेजा यांनी निकोटीन आणि अमली पदार्थांच्या व्यसनावर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी ध्यान, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट करत उपयुक्त उपाय आणि अनुभव सहभागींसमोर मांडले.

कार्यक्रमादरम्यान अनेक सहभागीांनी व्यसनमुक्तीचा स्वतःचा प्रवास आणि अनुभव कथन केले. त्यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी आणि प्रभावी ठरला. या कार्यक्रमाला ग्रेस संस्थेचे अध्यक्ष अभय भारती, सचिव शशिकांत पुरी तसेच केडीके कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.