spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी युवक अटकेत; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत 27 जून ला कामठी शहरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत २० वर्षीय युवकाला कामठीतुन अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ जून २०२६ रोजी रात्री १०.०० वाजल्यापासून ते दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजेदरम्यान कामठी शहरात ही घटना घडल्याचा आरोप आहे. फिर्यादी कडून जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला.

याप्रकरणी 20 वर्षोय आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.स.) कलम ७४ तसेच पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.०४ वाजता अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता असल्याने घरमंडळींनी पोलिस स्टेशन ची धाव घेतली .दरम्यान काही वेळेतच सदर पीडित अल्पवयीन मुलगी थेट पोलिस स्टेशन ला पोहोचली याप्रसंगी पीडितेच्या मोबाईल मध्ये असलेल्या चित्रफिती वरून घरमंडळीनी सखोल विचारपुस केली असता पीडित मुलीने आपबीती सांगून घटनेतील लैंगिक अत्याचाराची माहिती दिल्याने घरमंडळीना एकच धक्का बसला .पोलिसांनी त्वरित सदर घटनेसंदर्भात कामठी येथील 20 वर्षीय आरोपी विरुध्द जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार देत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.