बेला ३० : जवळच्या बरबडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील आदिनाथ गुरु माऊली सेवाश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी निमीत्य नागदेवतेचे उत्साहात पूजन करण्यात आले. यावेळी सेवाश्रमाचे संस्थापक ब्रह्ममूर्ती शेषानंद पांडे महाराज यांच्या शुभहस्ते नाग प्रतिमेचे पंचामृताने दुग्ध अभिषेक करण्यात आला.परीसरातील असंख्य भाविकांनी नागदेवतेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
आश्रमचे कोषाध्यक्ष प्रकाशजी घवगवे, सिंदी श्रीकृष्ण कामनकर,रविन्द्रजी गाडगे, भगत टेकाम, गुरूआई मंदाताई पांडे, सुक्ष्मा गाडगे, घवगवे, सुदरबाई निमसडे, रामप्यारी चंदेल, विवेक नान्हे, जनार्दन सुरकार, कमलाबाई भेन्डे, सुमन वांदिले पुजाराम खिरटकर, जसापुरचे समाजसेवक जनार्दन सुरकार वडगाव येथील ह भ प लिलाधर शिंदेकर उपस्थित होते.







