spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगरसेवकांचा वार्डनिधीमध्ये वाढ करून अर्थसंकल्पाला बहुमताने मंजुरी

– वार्ड निधी आता 35 लाख रुपये

– महापौर निधी 20 कोटी तर उपमहापौरनिधी 10 कोटीचा करण्यास मंजुरी

नागपूर :- प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांचा वार्ड निधी 25 लाख रुपयांवरुन 35 लाख करुन नागपूर महानगरपालिकेच्या सन 2026-27 या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर निधी 20 कोटी तर उपमहापौरांच्या विकास निधी 10 कोटी करण्याच्या सत्तारुढ पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.

मनपाची विशेष सभा (ता. 29) कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. अध्यक्ष स्थानी महापौर निता ठाकरे होत्या. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी मनपाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प व 2026-27 या आर्थिक वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गेल्या शनिवारी सभागृहात सादर केला होता. यावर आज झालेल्या चर्चेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी भाग घेतला.

जवळपास 11 तास चाललेल्या चर्चेनंतर या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. विशेष सभेमध्ये महापौर निता ठाकरे यांनी चर्चेचा समारोप करताना सत्ता पक्ष नेता नरेंद्र बाल्या बोरकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक नगरसेवक करिता वॉर्ड निधी 35 लक्ष रुपये करण्याची घोषणा केली तसेच महापौर निधी 20 कोटी रुपये व उपमहापौर निधी 10 कोटी रुपये करण्याची घोषणा केली.

चर्चेच्या शेवटी सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना शहराच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प असून यातील सर्व तरतुदींची अंमलबजावणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. मनपाचे सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मनपा तर्फे महसूल वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू आहे. त्यांनी प्रत्येक नगरसेवक करिता वॉर्ड विकास निधी 25 लक्ष रुपये करण्याची तसेच महापौर निधी 20 कोटी रुपये व उपमहापौर निधी 10 कोटी रुपये करण्याची मागणी केली. त्यांनी स्लॅम मधील चोकेजच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक झोन मध्ये सक्शन प्लस जेटिंग मशीन, गरोबा मैदान मध्ये ई लायब्ररी, 75 मैदान व 75 उद्यान यांच्या विकास करण्याची मागणी केली. त्यांनी परिवहन विभागाकरिता 200 कोटी रुपयांची प्रावधान करण्याची सूचना केली. तसेच एअरपोर्ट जवळ डॉ. हेडगेवार चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची सूचना केली.

सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांच्या सूचनेनुसार महापौर निता ठाकरे यांनी सुधारणेसह अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान केली.

महसूल वाढीसाठी प्रयत्न होईल – शिवानी दाणी

नागपूर शहराच्या विकासासाठी मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी दिली.

अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना शिवानी दाणी वखारे यांनी मनपाचे उत्पन्नात करण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी मालमत्ता कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर संकलकांना पीओएस मशीन दिली जाणार आहे. यामुळे घरोघरी जाऊन कराची वसुली करण्यात येईल. त्याचप्रमाणे कर वसुलीसाठी नगरसेवकांचे सहकार्य घेणार आहे.

मनपाच्या सर्व इमारतीवर रेन हार्वेस्टिंग करण्यत येणार आहे. शहरातील दहनघाटांचा विकास करण्यात येईल. शहराचा विकास शहरातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाणी यांनी सांगितले.

अर्थसंकल्पावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर म्हणाले की, शहराच्या विकासासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम निधीची आवश्यकता आहे. पण या अर्थसंकल्पात निधीची कमतरता भासणार असल्याचे दिसून येते. मनपाच्या आवकच्या तुलनेत अर्थसंकल्प जास्तीचा आहे. मनपाची डक्टिंग पॉलिसी ही उत्पन्नाचा चांगल स्रोत होऊ शकतो. तसेच वॉर्ड निधीमध्ये वाढ करण्यात यावी हा निधी रुपये 25 लक्ष वरून थेट 50 लक्ष रुपये करावी अशी मागणी त्यांनी केली.

76 नगरसेवकांनी केली चर्चा

मनपाच्या विशेष सभेत सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यावेळ सत्तापक्ष, विरोधी पक्ष सह सर्व गटनेते अशा एकूण 76 नगरसेवकांनी चर्चेत सहभागी नोंदविला.

आर्थिक मदतीची कारवाई

गीतांजली चौक येथे भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संतोष गौर यांना आर्थिक मदत देण्यासाठी कारवाई करण्याची सूचना महापौर निता ठाकरे यांनी प्रशासनाला केली. या संदर्भात नगरसेवक अभिजीत झा यांनी सभागृहांच्या निदर्शनास आणून दिले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.